कोट्यवधीची जमीन हडपण्याचा डाव उधळला

Foto
दोन आरोपींना ठोकल्या बेड्या; बनावट आधार कार्डचाही झाला वापर
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): मुंबई
महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान रस्त्यालगतच्या जमिनींचे कंपाउंड तुटल्याची संधी साधून बीडमधील भूमाफिया टोळीने मोक्याची जमीन हडपण्याचा कट रचला. दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करून जमिनीची परस्पर इसार पावती केल्याचा प्रकार छावणी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी तोतया जमीनमालकासह बनावट आधार कार्ड तयार करून
देणाऱ्या साथीदाराला बीड येथून अटक करण्यात आली असून, अन्य दोघांचा पोलीस शोध घेत आहेत. शेख हुसेन ऊर्फ शेख मोहंमद फर्दुस ऊर्फ शब्बीर गुलाम अब्बास युसूफ आणि इलियास फारुकी अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ज्योतीनगर येथील अल्पना सतीश मुंदडा (५९) यांच्या मालकीची मिटमिटा (गट क्र. १०९) येथे ६० गुंठे जमीन आहे. २०२४ मध्ये त्यांच्या भावाने त्यांना ही जमीन बक्षीसपत्राद्वारे दिली
होती. मुंबई महामार्गाचे काम सुरू झाल्याने समोरील बाजूचे कंपाउंड तुटले. मोकळी जागा पाहून एका अनोळखी व्यक्तीने तिथे या जमिनीचे मालक व कब्जेदार के. के. खान व मोबाइल क्रमांक असलेला काळा फलक लावला. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी के. के. खान याने जागेवर अतिक्रमण करून झाडे तोडली. कोट्यवधींची जमीन हडपली जात असल्याचे लक्षात येताच मुंदडा यांनी छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक विवेक
जाधव यांनी तपास करत तोतया मालक शब्बीर युसूफ आणि त्याला बोगस आधार कार्ड बनवून देणारा इलियास फारुकी (रा. बीड) या दोघांना अटक केली. या प्रकरणातील के. के. खान आणि पठाण अन्वर खान या अन्य दोन
असा शिजला जमिनीचा कट
दोन दिवसांनी शेजाऱ्यांकडून माहिती मिळताच मुंदडा यांनी चौकशी असता तेव्हा या टोळीचा मोठा कट समोर आला. मुंदडा यांच्या जमिनीची हुबेहूब चतुःसीमा दाखवून शब्बीर गुलाम अब्बास युसूफ (रा. सादोळा, जि. बीड) याने मूळ शेख हुसेन या व्यक्तीच्या माहितीचा वापर करून स्वतःचे बनावट आधार कार्ड बनवून घेतले. स्वतःला जमिनीचा मालक भासवून शब्बीरने १६ सप्टेंबर रोजी पठाण अन्वर खान (रा. सय्यदनगर, बीड) याच्या नावे परस्पर ताबा इसार पावती (विक्री करार) करून दिली. पठाण अन्वर खान याने एक पाऊल पुढे टाकत हीच जमीन अमजद खान याला विकण्यासाठी वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन प्रसिद्ध केले.
आरोपींवरही गुन्हा दाखल असून त्यांचा शोध सुरू आहे.